असलेल्या जोड्या फक्त चिखलणी स्पर्धेसाठी
*गौरव पोंक्षे |माखजन* बैल जोडीला वर्षभर पालन पोषण करायला लागणारा खर्च,लागणारे मनुष्यबळ यामुळे सध्या पारंपारिक सर्जा राजाच्या जोडीने होणारी भातशेती जवळपास हद्दपार होत चालली आहे.
बाजारामध्ये नवनवीन अत्यल्प किमतीत उपलब्ध असलेले पॉवर ट्रिलर,व मिळणारी शासकीय मदत यामुळे सध्या बैल जोड्या विकून पॉवर ट्रिलर विकत घेण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
काही शेतकऱ्यांकडे बैल जोड्या आहेत पण त्या निव्वळ चिखलणी स्पर्धेच्या आकर्षणामुळे.बैल जोडी फक्त चिखलणी स्पर्धेत उतरवायला,बाकी शेती पॉवर ट्रिलर ने असे वास्तव अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे
संगमेश्वर तालुक्यातील सरंद गावातील प्रगतशील शेतकरी संतोष गोटेकर ,यांच्या बळीराजा शेतकरी संघटनेने व माखजन च्या प्रगती ग्रामविकास संस्थेने २०११ मध्ये पारंपारिक सामूहिक भातलावणीला चालना दिली.पूर्वी जस केल जायचं की,अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या बैलजोड्या एकत्र आणून एकेका शेतकऱ्याची भातलावणी पूर्ण करायची व पुढे जायचं.ते राबवण्याचा प्रयत्न झाला.यामध्ये शेतकऱ्यांचा वेळही वाचायचा व पैसा ही वाचायचा.ही सामूहिक शेती करताना शेतकऱ्यांना विरंगुळा हवा,थोडी चिखलात मौज करता यावी यासाठी सायंकाळहून एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत चिखलातून बैलजोडी पळवायची असा खेळ केला जाई.व प्रोत्साहन म्हणून नंबर काढले जायचे.
सामूहिक भातशेतीच अनोख पारंपारिक स्वरूप पाहण्यासाठी विक्रमी गर्दी झाली. सरंद गावात सलग दोन वर्षे हा उपक्रम राबवल्यावर,आलेल्या बघ्यांनी सामूहिक भातशेती डोक्यात घेऊन न जाता ,चिखलणी स्पर्धेच खूळ डोक्यात घेऊन केले.बघता बघता सामूहिक भातशेतीचा मूळ हेतू राहिला बाजूला आणी चिखलणी स्पर्धेच पेव जिल्हाभर आल.बहुतांश ठिकाणी भातशेती केली जाते पॉवर ट्रिलर ने आणी बैल जोडी फक्त चिखलणी स्पर्धेला अशी अनेक ठिकाणी स्थिती आहे.
अनेक ठिकाणी चिखलणी स्पर्धा आयोजित केल्या जातात त्या ठिकाणी,भातलावणी हा विषयच गायब झालेला पाहायला मिळतो.सकाळपासून चिखलणी स्पर्धा व त्यानंतर त्या शेतात झालेला चिखल लावणीविनाच वाळून गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यामध्ये सध्या बैलांच्या संख्येत मोठी घट होताना पाहायला मिळत आहे.पॉवर ट्रिलर चा वाढता वापर असाच राहिला तर भविष्यात बैल जोडीच्या सहाय्याने भात अशी केली जायची हे पुढच्या पिढीला फोटो आणी व्हिडिओ मध्येच दाखवावे लागेल.जनावरांच्या घटलेल्या संख्येमुळे सध्या शेण खताचा प्रश्न देखील भेडसावू लागला आहे.त्यामुळे कोकणात सेंद्रिय शेती देखील काळबाह्य होऊ लागली आहे.
पावसाळ्यात शेतीची कामे सुरु असताना गावात फेर फटका मारताना शेतकऱ्यांचा बैल हाकवण्याचा विशिष्ट आवाज कानी पडत असे.आता तो आवाज पॉवर ट्रीलर च्या आवाजाने घेतला आहे.












