
तीन डब्यांचे मोठे नुकसान : पाच जणांचा मृत्यू
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एका मालवाहतूक ट्रेनने कंचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने रेल्वे अपघात झाला. एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
आगरतळा ते सियालदहला जाणारी ट्रेन क्रमांक 13174 कंचनजंगा एक्स्प्रेसला मागून मालगाडीने धडक दिल्यामुळे अपघात झाला. एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. रंगपाणी आणि निजबारी स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे.
रेल्वेमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम पोहचली आहे. त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरु केले आहे. रेल्वे आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.












