काॅलेजच्या १४ विद्यार्थ्यांची बेंगलोर, सोलापूर आणि महाबळेश्वर येथे निवड
लांजा (प्रतिनिधी) कल्पना कॉलेज लांजाच्या
हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या १४ विद्यार्थ्यांची बेंगलोर, सोलापूर आणि महाबळेश्वर येथे निवड झाली आहे. त्यामुळे कॉलेज ने दिलेल्या शंभर टक्के नोकरी या वचनाची पूर्तता केली आहे.
गेले ३ वर्षे लांजा सारख्या ग्रामीण तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल करण्यासाठी धडपडणाऱ्या आणि तालुक्यात आपल्या विविध उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या कल्पना असोसिएशन या संस्थेच्या कल्पना कॉलेज मधील विद्यार्थ्यांच्या विविध नामांकित हॉटेल मध्ये निवड झाली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या शेवटी नोकरी देत त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा देण्याचे काम गेली ३ वर्षे कल्पना कॉलेज च्या माध्यमातून होत आहे. यावर्षी देखील विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार बेंगलोर, सोलापूर आणि महाबळेश्वर अश्या ठिकाणी त्यांना नोकरीची संधी कॉलेज कडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सोलापूरसाठी अस्मिता महाजन, अक्षता घाडी, तुषार गुरव, समीर जड्यार, गौरव खेडस्कर ,मानसी सुर्वे, बेंगलोर साठी अनुजा पाटणकर, रूपाली घाणेकर, आकाश कांबळे, महाबळेश्वर साठी सौरभ कांबळे व तेजस दळी तर मालवण येथे सुविधा माने ,राजापूर येथे वैष्णवी गिरकर आणि रत्नागिरी येथे यश ताटके यांची निवड झाली आहे.











