रत्नागिरी माउंटेनिअर्स असोसिएशनच्या नऊ धडाकेबाज गिर्यारोहकांनी वजीर सुळका केला सर

Nine avid mountaineers of Ratnagiri Mountaineers’ Association climbed the Wazir cone Sir

 

रत्नागिरी | प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या माहुली किल्ला परिसरातील हा सुळका. ज्याला “वजीर सुळका” या नावाने ओळखले जाते. दुर्गम परिसर, उंचच उंच टेकड्या, घनदाट जंगल आणि त्या मधोमध असलेला हा 90° अंशातील 250 फुट उंचीचा सरळ “वजीर सुळका”. जिथे ही दृश्य पाहून सर्व सामान्यांच्या अंगाचा थरकाप उडतो. महाराष्ट्राच्या गिर्यारोहणातील वजीरच असलेला हा वजीर सुळका सर करण्याचे ध्येय उराशी बाळगून जिद्द चिकाटी आणि साहस याच्या जोरावर रत्नागिरीतील माउंटेनिअर्स असोसिएशनच्या नऊ धडाकेबाज गिर्यारोहकांनी 9 जानेवारीला वजीर सुळका यशस्वीरित्या सर करून प्राणप्रिय भारतीय राष्ट्रधज फडकावला.

निसरडी गवताळ पाऊलवाट, 90° अंशातील सरळ अशी उभी अतिकठीण चढाई, सुळक्याच्या पूर्वेकडील दरीचा उतर जवळपास 600 फुट खोल आणि पाण्याची प्रचंड कमतरता. या सुळक्यावरती चढाई करायचं ठरवलं आणि इकडचा पाय तिकडे जरी गेला तरी त्या व्यक्तीला थेट दरीच्या जबड्यातच विश्रांती घ्यावी लागते अशी चर्चा केली जाते. या वजीर सुळक्यावरती चढाई करण्याची कल्पनाही करणं अश्यक्य असते. मात्र रत्नागिरीतील माउंटेनिअर्स असोसिएशनच्या टीमने सुळक्यावरती यशस्वी चढाई करून अश्यक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे.

8 एप्रिलला रात्री या मोहिमेला सुरुवात झाली. रत्नागिरी ते ठाणे, ठाणे ते वाशिंद व वाशिंद ते वांद्रे गाव ( वजीर सुळक्याच्या पायथ्याचे गाव ) असा जाण्याचा मार्ग आखला होता. सकाळचा नाश्ता करून टीम वजीर कडे जाण्यास निघाली. सुरुवातील जवळपास दीड तासाचा ट्रेक करून टीम वजीर जवळ पोहचली. सर्वांनी गिर्यारोहनाची उपकारणे घालून चढाईस सुरुवात केली. नाशिक येथील मावळे माउंटन रेंज या गिर्यारोहण संस्थेचे संचालक श्री.चेतन बेडकोली व त्यांच्या टीमने टेक्निकल सपोर्ट देत मोलाचे मार्गदर्शन केले. व सर्व गिर्यारोहकांनी वजीर सुळका सर करून भारताचा राष्ट्रध्वज फडकावून आनंद साजरा केला. 10 एप्रिलला गिर्यारोहण टीम रत्नागिरी मध्ये दाखल झाली. या धडाकेबाज नऊ गिर्यारोहकांनी अती कठीण असा वजीर सुळका लीलया सर केला त्यांच्या या धाडसाचे संपूर्ण रत्नागिरीत कौतुक केले जात आहे.

9 गिर्यारोहकांनी सुळक्यावरती केली यशस्वी चढाई

माउंटेनिअर्स असोसिएशन, रत्नागिरी टीमचे फिल्ड इन्चार्ज श्री.आकाश पालकर व ट्रेक लीडर श्री. ओम पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली 9 गिर्यारोहकांनी सुळक्यावरती चढाई केली व तिरंगा फडकविला. यामध्ये यश विश्वासराव, गार्गी गायकवाड, पार्थ शेलार, आश्रय शिंदे, प्रसाद कासार, साहिल मुळये, मानस कीर, अद्वैत जोशी, साईराज मयेकर या गिर्यारोकांचा सहभाग होता.

कोट

वजीर सुळका सर करण्याची ही माझी तिसरी मोहीम असल्याने केवळ दीड तासात हा सुळका सर केला. वजीर सुळका हा अतिधोकादायक आणि कठीण चढाईच्या श्रेणीत गणला जातो. केवळ गिर्यारोहकणाच्या साहित्याने हा सुळका सर करता येतो. सर्व अत्याधुनिक साहित्य असल्याने सुरक्षेची शंभर टक्के खात्री होती. मानसिक तयारी आणि साहसाच्या जोरावर हा सुळका समूहाने सर केला. या सुळक्यावरुन माहोली किल्ला दृष्टीपथास पडतो. तसेच नजर पुरत नाही एवढा प्रचंड एरिया दिसतो.

– श्री. आकाश पालकर (माउंटेनिअर्स असोसिएशन, रत्नागिरी टीम फिल्ड इन्चार्ज)