संजीवन गुरुकुल मधे ‘शाळा तिथे खगोल मंडळ’ उपक्रमाची सुरुवात

आमच्या गो जो महाविद्यालयच्या खगोल अभ्यास केंद्राच्या माध्यमातून “शाळा तेथे खगोल मंडळ” या प्रतिनिधिक उपक्रमाची सुरुवात आजपासून पटवर्धन हायस्कूलच्या गुरुवर्य रा. पु. जोग संजीवन गुरुकुल विदयार्थी तुकडीबरोबर करण्यात आली.

उदघाट्न कार्यक्रम आज दक्षिणायन दिनाच्या पूर्वसंधीला 30 जेष्ठ 1946 (20 जून 2024) सुमारे 133 विदयार्थ्यांच्या व शिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर गुरुकुल च्या निवडक 25 विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या चमूकडून सूर्यमालेची अंतरानुसार प्रतिकृती बनवून घेण्यात आली.
विदयार्थ्यांनी व दोन शिक्षक प्रतिनिधिनी उत्साहानें सहभाग घेतला.

जानेवारी महिन्यापर्यंत प्रति महिना हा उपक्रम चालेल.

या खगोल मंडळातील विदयार्थ्यांना प्राथमिक खगोल शास्त्र, सूर्यमाला, विश्व उत्पत्ती, आकाशगंगा, अवकाशीय घटना, दुर्बीणीद्वारे व दुर्बीणीशिवाय अवकाश दर्शन, प्राथमिक खगोल गणित याची माहिती येत्या काळात देण्यात येईल. उपक्रमाची सांगता विदयार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृती, पोस्टर्स, आकाशनिरीक्षणाने व विविध उपक्रमानी होईल.

पटवर्धन गुरुकुलच्या व्यवस्थापिका सौ. मनाली नाईक व सहकारी यांच्या पुढाकाराने खगोल मंडळाची स्थापना करण्यात आली.