मालवणी बाजार शाखा आचरा येथे मिरची महोत्सव साजरा

Google search engine
Google search engine

Chilli festival celebrated at Malvani Bazar Branch Achra

आचरा | अर्जुन बापर्डेकर : ग्राहकांना विविध प्रकारच्या दर्जेदार मिरच्या एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात , याहेतूने मालवणी बझार शाखा आचरा तर्फे आयोजित मिरची महोत्सवाचे उद्घाटन माजी सभापती निलीमा सावंत यांच्या हस्ते झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भगवती एज्युकेशन सोसायटी मुणगेचे उपाध्यक्ष सुरेश बांदेकर लोकमान्य संस्था आचराचे म्यानेजर मोरवेकर, मिराशी , केळूसकर. दिगंबर मुंबरकर आदीमान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक हनुमंत प्रभू यांनी केले मिरची महोत्सवाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला मालवणी बाजारचे सर्व कर्मचारी उपस्थित होते