रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांचा स्तुत्य उपक्रम
वैभववाडी l प्रतिनिधी : वैभववाडी रोटरी क्लबच्या वतीने नावळे धनगरवाडी येथील विद्यामंदिर प्रशालेत सर्व विद्यार्थ्यांना छत्री व दप्तरांचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रेसिडेंट रो संजय रावराणे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे कौतुक केले. व शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक यांनी शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना छत्री, दप्तर व टूथपेस्ट-टूथ ब्रशचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे चार्टर्ड प्रेसिडेंट रोटेरियन संतोष टक्के, रोटरी रोटरियन प्रशांत कोळी, रोटरियन श्रेया धावले, मुख्याध्यापक श्री भरडकर सर, उपशिक्षक श्री माने सर, उपशिक्षिका उपस्थित होते.











