खेड जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांनी केले वेरळ येथे वृक्षारोपण

 

खेड (प्रतिनिधी) येथील खेड तालुका जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनमधील सदस्य डॉक्टर यांनी वेरळ गावाच्या परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी त्यांनी लागवड केलेल्या रोपांचे वृक्षांमध्ये रूपांतर होण्यासाठी जपणूक करण्याचा निर्धार केला.

खेड तालुका जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने तालुक्यातील वेरळ येथे सदस्य डॉ. सौरभ पेंडसे यांच्या आवारात औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये वड, पिंपळ, रक्तचंदन, बिब्बा, कडुनिंब, धूप, सीता अशोक यासारख्या विविध वनस्पती समाविष्ट होत्या. लायन्स क्लब खेड यांच्याकडून या उपक्रमासाठी असोसिएशनला देण्यात आलेले सीड बॉल्सचा देखील वापर करण्यात आला

यावेळी डॉ. प्रसन्न बाळ, डॉ. निलेश भोसले, . डॉ. विलास शेळके, डॉ. सौरभ पेंडसे, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. सत्यवान सोनावणे, डॉ. परेश मळणगावकर, डॉ. अखिल पवार, डॉ. सुक्षेम सारंग उपस्थित होते.

यावेळी वृक्षारोपणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्ष डॉ. श्याम गील्डा, सेक्रेटरी डॉ. आदेश भोसले, माजी अध्यक्ष डॉ दीपक मोरे, डॉ. सिद्धेश चिकले, डॉ. विनोद स्वामी, डॉ. नंदन गौरात, कार्यक्रम प्रमुख डॉ. विलास शेळके यांनी सगळ्यांचे आभार मानले.