खेड (प्रतिनिधि) भरणे येथील श्री काळकाई कृपा टेंम्पो चालक- मालक संघटना आणि कळंबणी उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संघटनेच्या कार्यालयात आयोजित रक्त तपासणी शिबिरात ५० हून अधिक जणांनी तपासणी केली.
कळंबणी उपजिल्हा रूग्णालयाचे समुपदेशक व्ही. एन. म्हस्के यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब, एड्स, क्षयरोग, मानसिक आजार यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी संघटनाध्यक्ष मनोज काते, उपाध्यक्ष अनंत व्हरांडे, सचिव विश्वास सुर्वे, सहसचिव नथुराम खेडेकर, खजिनदार महेंद्र चव्हाण, संघटक पराग येलवे, संजय जाधव, माजी अध्यक्ष रमेश घोले, कार्याध्यक्ष सूर्यकांत धाडवे, दिलीप पार्टे, दिलीप जड्याळ, सुनील जानकर, कृष्णा मेस्त्री, संकेत काटकर, आशिष व्हरांडे, श्रीकांत खोपकर, संजय जाधव, दत्ताराम चव्हाण, दिलखुश जाधव आदी उपस्थित होते.












