रत्नागिरी : होप फाउंडेशन, फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पीएचडी संशोधन केंद्राचा विद्यार्थी डॉ. प्रवीण एस. जांगीड यांना मुंबई विद्यापीठामार्फत पीएचडी ही पदवी प्रदान करण्यात आली.
फिनोलेक्स ॲकॅडमीमधील संशोधन केंद्र हे कोकण विभागातील इंजिनीअरिंगचे एकमेव संशोधन केंद्र आहे डॉ. प्रवीण एस. जांगीड यांनी फिनोलेक्स ॲकॅडमीच्या इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी या विभागातील संशोधन केंद्रातून ‘इव्हॉल्विंग ऑथेंटिकेशन कन्सिडरेशन फॉर इंटरनेट ऑफ बायोमेट्रिक थिंग्ज’ या विषयावर पीएचडी ही पदवी प्राप्त केली आहे. या संशोधन प्रकल्पासाठी गाईड म्हणून डॉ. विनायक अशोक भराडी यांनी मार्गदर्शन केले.
इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी या विभागातील पीएचडी संशोधन केंद्रांतर्गत पीएचडी प्राप्त झालेला फिनोलेक्स ॲकॅडमीचा हा पहिला विद्यार्थी आहे. त्यांनी फिनोलेक्स ॲकॅडमीमध्ये जून २०१९ मध्ये प्रवेश घेतला होता. पीएचडी पदवी प्राप्त झाल्याबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.










