अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे तर्फे माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव..

 

परुळे l प्रतिनिधी :परुळे येथील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे प्रशालेच्या वतीने माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. मार्च 2024 मध्ये झालेल्या परीक्षेत प्रशालेतील एकूण 42 विद्यार्थी बसले होते यावेळी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल सलग 10 वर्ष 100 टक्के लागला आहे. त्यामुळे सर्व यशस्वी विद्यार्थी यांचा शाळेच्या वतीने गुणगौरव करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमात अध्यक्ष भोगवे माजी सरपंच महेश सामंत शाळा संचालक अविनाश देसाई डॉ उमाकांत सामंत भोगवे उपसरपंच रुपेश मुंडये शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई अभय परुळेकर पालक संघ उपाध्यक्ष शंकर घोगळे मुख्याध्यापक एस एम माने. अमेय देसाई यासह शिक्षक व पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते यावेळी दहावी मध्ये उत्तीर्ण प्राथमिक पाच क्रमांक व उर्वरित सर्व उत्तीर्ण विद्यार्थी तसेच शिष्यवृत्ती पात्र यश मिळवले ल्या पाचवीच्या व आठवीच्या मुलांचा सन्मान करण्यात आला यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रथम तीन क्रमांकांच्या विद्यार्थी याना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सचिन देसाई tमहेश सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व उपस्थित मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अर्पि ता सामंत हिने आपले मनोगत व्यक्त केले