खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्यार्थी ३० जून रोजी गुणगौरव सोहळा

 

खेड(प्रतिनिधी) खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या ३०जून रोजी सकाळी ठिक ११ वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संघटनेचे विद्यमान अध्यक्ष मंदार हळदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे

. सदर कार्यक्रमात सन २०२३/२४ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, बी ए बीकॉम बीएससी. , उत्तीर्ण विद्यार्थी, इंजिनिअरिंग, मेडिकल क्षेत्रातील उत्तीर्ण विद्यार्थी, जेईई, नीट उत्तीर्ण विद्यार्थी, इयत्ता ५वी , ८वी शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी तसेच इतर क्षेत्रात शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले विद्यार्थी या सर्वांचा संघटनेच्या वतीने गुणगौरव करून बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन ठेवण्यात आले आहे. कृपया सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.