आपल्या माध्यमातून नक्कीच मालवण शहराचा विकासात्मक कायापालट होऊ शकतो!

भाजपा नेते निलेश राणे यांना युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी विविध मागण्याबाबत दिले निवेदन

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर तसेच तालुक्यातील विविध जनहिताच्या प्रश्नांबाबत भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी भाजपा नेते निलेश राणे यांचे लक्ष वेधले आहे.याबाबत आपण लक्ष देऊन प्रशासनास सूचना कराव्यात. तसेच ज्या नवीन सुविधा आवश्यक आहेत त्यासाठी शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा कराल. आपल्या माध्यमातून नक्कीच शहराचा विकासात्मक कायापालट होऊ शकतो. अशी मागणी सौरभ ताम्हणकर यांनी भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडे केली आहे.

मालवण शहरातील कचऱ्याचे प्रश्न अधिक वाढत आहे. मोठ्या संख्येने असलेले भटके कुत्रे तसेच गुरे काही ठिकाणी साचलेला कचरा आजूबाजूला पसरावतात. त्यामुळे अधिकच घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरते.

मालवण शहर हे पर्यटन दृष्ट्या विकसित होत असलेले शहर आहे. पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मालवणचा निसर्ग येथील समुद्र किनारे, निसर्ग सौंदर्य, येथील खाद्य पद्धती जगभरात प्रसिद्ध आहे.

‘नेव्ही डे’ दरम्यान मालवण शहरात स्वछता ठेवण्यात आली होती. मात्र आता मालवण शहरातील कचऱ्याची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. मालवण शहरात ठीक ठिकाणी कचरा रस्त्यावर पसरलेला असतो. तर मालवण मच्छी मार्केट समोरील बाजूस कचऱ्याचा साम्राज्य पसरलेले असते. बाजाराला येणारे परप्रांतीय भाजी विक्रेते तसेच काही व्यावसायिक, नागरिक ही कचरा त्या ठिकाणी आणून टाकतात. मालवण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत सकाळच्या वेळेस ती जागा स्वच्छ करण्यात येते परंतु काही वेळा नंतर परत त्या ठिकाणी कचरा सर्वत्र टाकला जातो. याकडे नागरपालिकेने लक्ष द्यावा. त्याठिकाणी एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावा. जेणेकरून त्या ठिकाणी जे कोण कचरा टाकत आहेत ते दिसून येईल. पालिकेला कारवाई करण्यास मदत होईल.

मालवण नगरपालिका कर्मचाऱ्यांन तर्फे मच्छी मार्केट स्वच्छता मोहीम काही दिवसांपूर्वी राबिवण्यात आली. ह्यावेळी मच्छी मार्केट व परिसरात डास प्रतिबंधक फवारणी ही करण्यात आली. त्याचे कौतुक आहे. परंतु स्वच्छता केली त्या ठिकाणी काही तासात परत सर्वत्र कचरा फेकण्यात आला. त्या मोहिमेचा काही फायदा झाला नाही. असे मालवण किनारपट्टी व शहरात बऱ्याच ठिकाणी झाले आहे. मालवण बंदर जेट्टी ते मच्छी मार्केट पर्यंत अनेक ठिकाणांवर रात्रीच्या वेळेस कचरा टाकला जातो. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तरी माझी मालवण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना एकच विनंती करती कि त्यांनी ह्या जागेची स्वतःहून पाहणी करावी. या ठिकाणी उपयोजना राबवाव्यात.

नागरपरिषदे मार्फत रात्रीची एक कचरा गाडी मालवण बाजार पेठेत फिरवावी. जेणे करून ते सर्व जण आपला कचरा त्या गाडीत देतील व त्या कचऱ्याची व्यवस्थित रित्या विल्हेवाट लागू शकेल. हि गाडी रात्री १० नंतर फिरली तर उत्तम होईल.

४ डिसेंबर २०२३ रोजी भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. नव्या पर्यटन केंद्र मुळे मालवण शहरात पर्यटकांचा ओढा वाढला आहे. याचा विचार करता मालवण बंदर जेट्टी ते मालवण दांडी येथील दांडेश्वर मंदिरा पर्यंत कोस्टल रोड (बंधारा कम रस्ता) होणे गरजेचे आहे.

यामुळे मालवण बंदर जेट्टीवर आलेला पर्यटक कोस्टल रोडनें समुद्राच्या लाटांचे अनंत घेत दाडेश्वर मंदिरापर्यंत जाऊ शकेल. त्याच प्रमाणे किनारपट्टी भागाला काही ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. ह्या मार्गामुळे किनारपट्टी भाग देखील स्वच्छ राहील. किनारपट्टी भागात मुख्य व्यवसाय म्हणजे मच्छिमारी कोस्टल रॉड मुळे मच्छिमारांना मोठया मासे वाहतूक गाडीत मच्छी लोड करणे देखील सोपे होणार आहे. मालवण शहरातील दांडी परिसरात अतिवृष्टी वेळी किंवा समुद्राला उधाणाच्या वेळेस समुद्राचा पाणी वस्तीत येत असते. कोस्टल रोड मुळे हे देखील प्रमाण कमी होईल. मालवण शहरात पर्यटनाच्या दृष्टीने हा रोड महत्वपूर्ण ठरेलं. असे निवेदनात म्हटले आहे.