मिरकरवाडा येथे पावसामुळे घराचा भाग कोसळला

 

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा या सतत गजबजलेल्या ठिकाणी आज सकाळी शफीक सलाम साखरकर यांच्या घराचा काही भाग कोसळला असल्याने चार दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे.

 

 

सुदैवाची बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची जीवितहाणी झाली नसल्याचे समोर आले.हे घर फारच जुने असल्याने पावसाळ्यात त्याला धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात होती.आणी अखेर ग्रामस्थांचा अंदाज खरा ठरला व घराचा काही भाग अवघ्या काही सेकंदातच कोसळला..