तालुका सुंदर गाव म्हणून गोळवणची निवड!

Google search engine
Google search engine

The choice of Golwan as a taluka beautiful village!

सरपंच सुभाष लाड यांची माहिती

मसुरे | झुंजार पेडणेकर :आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव (स्मार्ट ग्राम) योजना” सन २०२१-२२ मध्ये ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल ची मालवण तालुक्यात प्रथम क्रमांकाने निवड झाल्याची माहिती सरपंच सुभाष लाड यांनी दिली आहे. तालुका स्तरावरून दहा लाख रुपये बक्षिस रक्कम मिळणार आहे.

सदर ग्रामपंचायतची जिल्हा स्तर समितीची तपासणी १८ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. कुडाळ तालुक्यातून तुळसुली क नारूर, देवगड मधून दाभोळे, वेंगुर्ले मधून परुळे बाजार,दोडामार्ग मधून झोळंबे, कणकवली मधून लोरे, वैभववाडी मधून अरुळे, सावंतवाडी मधून निरवडे या गावांची तालुका स्तरावर निवड झाली आहे. सदर ग्रामपंचायतींची तपासणी पुढील आठवड्यात होणार असून त्यानंतर जिल्ह्या सुंदर गाव घोषित करण्यात येणार आहे.