आंबव पोंक्षे जि.प.शाळा आवारात वृक्षारोपण

 

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे जिल्हा परिषदेच्या शाळा आवारात वृक्षारोपण करण्यात आले.कृषी दिनाचे औचित्य साधून हे वृक्षारोपण करण्यात आले.या वृक्षारोपण कार्यक्रमाला गावचे सरपंच शेखर उकार्डे,मुख्याध्यापिका सौ प्राची पाटणकर,शिक्षिका सौ सविता पोंक्षे,सौ पवार,सौ गोटेकर,आशासेविका सौ कुडतडकर, अंगणवाडी सेविका सौ भायजे,सौ तांबे आदिंसह सावर्डे येथील कृषी महाविद्यालयातून दाखल झालेल्या कृषी कन्या उपस्थित होत्या.

 

 

यावेळी वृक्षलागवड करण्यात आली.कृषिकन्यांनी वृक्ष लागवड ही काळाची का गरज आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.सरपंच शेखर उकार्डे यांनी आपल्या भाषणातून आपल्या गावात गत पाच वर्षात फळबाग लागवड योजनेतून कशी उन्नती झाली आहे.हे विषद केले.जिल्ह्याच्या पटलावर आपल्या गावात झालेली विक्रमी फळझाडें लागवड या विषयी माहिती दिली.
मुख्याध्यापिका सौ प्राची पाटणकर यांनी झाडें लावणं सोप आहे.ती जबाबदारीने जगवता आली पाहिजेत.यासाठी आपण यशस्वी प्रयत्न करूया असे आवाहन केले.यावेळी शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते