पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच आसीम साल्हे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच आसिम साल्हे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तेलगडे, शब्बीर शेख, सौ. सिद्धी जाधव, सौ. कस्तुरी खैर, सौ. पुजा पागडे, श्री. प्रफुल्ल साहेब, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सुदेश हडकर, राजन चव्हाण, सौ. ईश्वरी चव्हाण आदि उपस्थित होते.