Sharyu Baker M.B.B.S. passed the exam
मंडणगड | प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल मंडणगड येथील शिक्षक श्री. शांताराम बैकर यांची कन्या कुमारी शरयू शांताराम बैकर वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी. एस. परिक्षा उत्तीर्ण झाली आहे.शरयू ने पाचवी वी ते दहावीचे शालांत शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड येथे सेमी इंग्रजी माध्यमातून पुर्ण केले विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण संजय घोडावत ज्युनिअर कॉलेज हातकणंगले. कोल्हापूर येथे पुर्ण केले. निट परीक्षा तयारी शाहू कॉलेज लातूर.येथून दिली. जळगाव शासकीय मेडीकल कॉलेज येथून एम.बी.बी.एस चे शिक्षण पुर्ण केले.
शालेय अभ्यासात अतिशय अभ्यास विद्यार्थी असलेल्या शरयू ने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यात चौथी तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यात पंधरावी आली होती. चतुरंग प्रतिष्ठानचा आदर्श विद्यार्थीनी पुरस्काराने सन्मानित झाली असून रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित निबंध स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवून गृहमंत्री कै. आर्. आर. पाटील यांच्या हस्ते सन्मानित झाली आहे. तालुकास्तरीय निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा जिल्हास्तरीय विज्ञान रंजन स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन विशेष प्राविण्य मिळवीले आहे तिचे तालुक्यातून कौतूक होत आहे.