छायाचित्रकार विजय शेटये यांचे दुःखद निधन

Google search engine
Google search engine

Sad demise of photographer Vijay Shetye

दोडामार्ग | प्रतिनीधी : दोडामार्ग शहरातील नामवंत फोटोग्राफर तथा बाजारपेठेतील धनश्रुती फोटो स्टुडिओचे मालक विजय शंकर शेटये यांचे नुकतेच गोवा येथे दुःखद निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. येथील बाजारपेठेत गोवा रोडवर त्यांचा बऱ्याच वर्षांपासून फोटो स्टुडिओ होता. ते मनमिळावू स्वभावाचे होते. शहरात त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. ते तालुका पत्रकार संघाचे सदस्यही होते. उत्कृष्ठ छायाचित्रकार म्हणून दोडामार्ग तालुका पत्रकार समितीने त्यांना पुरस्कार देऊन गौरविले होते. अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे सुंदर छायाचित्रे येत आहे. तसेच त्यांच्या फोटोग्राफीचे नाव दुरदूरवर पोहचले होते. अलीकडेच काही वर्षांपासून त्यांची प्रकृती खालावली होती ते थिवी – गोवा येथे राहत होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, जावई, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल शहरात हळहळ व्यक्त होते आहे.