खेड (प्रतिनिधी) आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत तालुक्यातील दहिवली येथे ग्रामस्थांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या समस्या जाणून घेत सोडवणूक करण्याच्या दृष्टीने कटाक्षाने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
रस्ता डांबरीकरणासाठी निधी मंजूर झाला असून पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम मार्गी लागेल, असेही आमदार कदम यांनी ग्रामस्थांना सूचित केले. ६ जुलै रोजी मुंबई व स्थानिक ग्रामस्थ यांच्यासमवेत ७ जुलै रोजी कांदिवली-मुंबई येथील पालखी निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.









