सावंतवाडी । प्रतिनिधी :
आंबेगाव मधलीवाडी येथील रहिवासी श्री चंद्रकांत सिताराम केळुस्कर (६६) यांचे आज पहाटे सुमारे २.३० वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना जावई नातवंडे तसेच भाऊ, भावजया आणि पुतणे असा मोठा परिवार आहे.. ते महाराष्ट्रीय चॅरिटी ट्रस्ट जिल्हा शाखा सिंधुदुर्ग चे विद्यमान खजिनदार सिताराम (अण्णा ) केळुस्कर, क्षेत्रपाल एंटरप्रायजेस आपले सरकार सेवा केंद्र, कोलगावचे मालक तसेच आंबेगाव ग्रामपंचायत चे कर्मचारी नितीन केळुस्कर यांचे वडील होत.












