महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गुहागर शाखेचा गुणगौरव समारंभ संपन्न

गणिताचा भास्कराचार्य व आरटीएस परीक्षेतील गुणवंतांचा केला गौरव

गुहागर | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा गुहागरच्या वतीने गुणवंतांच्या गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते गुहागर तालुका कुंभार समाज भवन शृंगारतळी येथे सदर समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी होते या कार्यक्रमप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी गणपत पांचाळ, समितीचे माजी कोकण विभागीय अध्यक्ष अंकुश गोपने, जिल्हा सरचिटणीस संतोष सुर्वे, पतपेढीचे संचालक माजी चेअरमन बळीराम मोरे,स़ंगमेश्वरचे पतपेढी संचालक दिलीप महाडीक,माजी शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद कासारे ,माजी जिल्हा सचिव रूपेश जाधव, सल्लागार रमेश गोताड शिक्षक नेते विश्वास बेलवलकर, केंद्रप्रमुख श्रीकांत वेल्हाळ, अशोक गावणकर कैलास शार्दुल, नामदेव लोहकरे,माजी संचालक प्रमोद नेटके , महिला प्रतिनिधी ममता विचारे तालुका उपनेते संतोष धामणस्कर, जिल्हा सहसचिव ऋषिकांत पवार, जिल्हा संघटक राहुल आमटे,ऑडिटर विनायक काणेकर, दापोली अध्यक्ष जावेद शेख प्रसिद्धी प्रमुख परमेश्वर गायकवाड केंद्रसंघटक अमोल मोरे संतोष येलकर व अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली होती

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या “आमचा गणिताचा भास्कराचार्य” ठरलेले पात्र विद्यार्थी,आबलोली नं.२ शाळेची निधी हर्षद माने, जानवळे नं १ शाळेची स्वरा गणेश रोडे,ऋग्वेद विश्वास लांजेकर, निरंजन मिनेश शिगवण, वेळणेश्वर नं. १ शाळेचा चैतन्य रमेश गोणबरे, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय अंजनवेल शाळेचा स्वराज बाबासाहेब राशिनकर, वरवेली नं.२ शाळेची वैष्णवी सुनील डिंगणकर, सुरळ मराठी शाळेचा गणेश बाळासाहेब खंदारे, पाभरे शाळेचा विराज विष्णू नाचरे, वेळंब नं.२ घाडेवाडी शाळेचा रिषभ सचिन पागडे, मासू नं.१ शाळेचा समृद्धी सुधाकर रसाळ, कारुळ शाळेची श्रावणी रमेश पवार यांचा व त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला RTS रत्नागिरी प्रज्ञाशोध परीक्षेतील तालुकास्तरीय पात्र विद्यार्थी खोडदे मोहितेवाडी शाळेची पूजा रमेश मोहिते, पडवे मराठी शाळेचा शौर्य नरेश पावसकर जानवळे नं १ शाळेचा कुशल वैभवकुमार पवार, अनुजा अशोक बागकर. मढाळ नं.१ शाळेचा गणराज शशिकांत डिंगणकर काजुर्ली क्र. २ शाळेची सोनाली मोहन डिंगणकर यांचा व या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाचा यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार पुरस्कार प्राप्त शाळा जाणवळे नं.३ व काजुर्ली नं २ यांचा तसेच जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका माधवी पाटील राज्यस्तरीय आदर्श विशेष शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक दशरथ कदम,जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मानप्राप्त शिक्षिका ऋतुजा सोहनी यांचा तसेच सेवानिवृत्त शिक्षक लतिका जगताप , सुहासिनी आखाडे,श्रीकांत पांचाळ, शेखर जोशी,सौ.स्नेहा साळवी, प्रियंका किर,राजेंद्र शिर्के, रमेश रायसिंगवाकडे,अविनाश दहीवलकर,दिलीप वसावे,प्रिया बापट यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक जावरे व अश्विन वाघमारे यांनी तर आभार प्रभु हंबर्डे यांनी मानले कार्यक्रम यशस्वितेसाठी तालुकाध्यक्ष अरविंद पालकर सरचिटणीस नरेंद्र देवळेकर, सदानंद कांबळे, विकास पाटील, किरण सुर्यवंशी, चंद्रकांत बेलेकर, समीर पावसकर, कार्यकारिणीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली