पाल गावात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून विकासगंगा आली : भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली

नळ पाणी योजना व रस्ता डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ…

वेंगुर्ले | प्रतिनिधी : वेंगुर्ले तालुक्यातील पाल गावात विविध विकास कामांची भूमिपूजने भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आली. दरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पाल गावात विकासगंगा आली, असे मत श्री. तेली यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले. यावेळी जलजिवन मिशन अंतर्गत नळ पाणी योजनेचे व पाल-कदमवाडी, टेंबवाडी, तुळस रस्ता डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ श्री. तेली यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , पाल सरपंच कावेरी गावडे , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , शक्तीकेंद्र प्रमुख कमलेश गावडे , बुथ अध्यक्ष हरी गावडे , उपसरपंच प्रीती गावडे, ग्रा.पं.सदस्य स्नेहल पालकर , संपदा पिंगुळकर , संजय गावडे, अच्युत परब , कृष्णा पेडणेकर , अमोल घाडी , सुशील पेडणेकर , सत्यवान केरकर , शामल केरकर , रुचीरा पालकर , कविता पालकर , अमिता पालकर , राजन केरकर , साईराज पालकर , साहील पालकर , शुभम पालकर , पांडुरंग मोघे, सुमीत्रा गावडे , सखाराम केळजी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

पाल गावातील पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी १ कोटी २५ लाख रु.काम मंजूर झाले असून विहीर , टाकी व पाईपलाईन कामाचे भूमिपूजन तसेच पाल कदमवाडी टेंबवाडी तुळस रस्ता खडी.व डांब. या रस्त्याला विवीध विभागाचा १६.५० लक्ष निधी मंजूर झाला या दोन्ही विकास कामांचे भूमिपूजन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले की, आता केंद्रात व राज्यात भाजपाचे डबल इंजीन सरकार आहे त्यामुळे निधीची कमतरता पडणार नाही . केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने कोकणात विकासाची गंगा आणली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोट्यावधीचा निधी विकास कामांना मिळाला आहे , त्यामुळेच गावागावात भूमिपूजनाचा धडाका सुरु आहे .तसेच पाल ग्रामस्थांनी बिनविरोध ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात दिल्याबद्दल ही विकासकामांची भेट असल्याची जिल्हाध्यक्ष राजन तेली सांगीतले .यावेळी भुमिका देवी मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने मानकरयांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा सत्कार करण्यात आला.