डेरवण प्रशालेत रोबोटीक लॅब चे उद्घाटन

 

 

माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांची उपस्थिती

चिपळूण (प्रतिनिधी)—: श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स डेरवण, सावर्डे या प्रशालेमध्ये नुकतेच रोबोटीक व आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा अत्याधुनिक अभ्यासक्रमाने युक्त असणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक दोन्ही विभागाचे उद्घाटन राज्यसभेचे माजी खासदार व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

स्काय रोबोटिक चे डायरेक्टर अभिजीत सहस्त्रबुद्धे आणि श्रीयुत कृष्णमूर्ती यांच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम इयत्ता पहीली ते दहावी करिता या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहे. उद्घाटनानंतर उपस्थितांना मध्ये उपलब्ध असणारी अत्याधुनिक उपकरणे विविध प्रकारचे रोबोट्स, थ्रीडी प्रिंटर्स, रोबोटिक किड्स, प्रगत संगणक प्रणाली इत्यादींची वैविध्यपूर्ण माहिती देण्यात आली. त्यानंतर शाळेमधील कार्यान्वित असणाऱ्या अटल टिकरीन लॅब, स्पेस लॅब आणि कलादालनाला डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला ग्रामीण भागात असूनही या शाळेच्या विकसित भारत बनविण्याच्या दूरदृष्टीबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी शाळेच्या संचालिका सौ. शरयू यशवंतराव व संस्थेतील विविध विभागाचे पदाधिकारी मुख्याध्यापक पालक विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी खांडेकर यांनी केले व प्राथमिक मुख्याध्यापिका प्राजक्ता चाळके यांनी सर्वांचे आभार मानले.

चौकट :

स्पर्धात्मक जगात वावरताना ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे हे गरजेचे असते आणि तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती करणाऱ्या २१ व्या शतकातील आव्हाने पेलणारे विद्यार्थी तयार करण्यासाठी रोबोटीक व आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब निर्माण करीत आहोत असे मत संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी विकासराव वालावलकर यांनी व्यक्त केले.