रो. अशोक नाईक यांची उपस्थिती
चिपळूण (प्रतिनिधी):– चिपळूण रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा दिनांक 10 जुलै रोजी रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 बेळगाव साउथ चे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. अशोक नाईक यांच्या हस्ते संपन्न होत आहे. बेळगाव मधील प्रसिद्ध व्यावसायिक, बिल्डर व ओघवते वक्तृत्व असलेले व्यक्तिमत्व या सोहळ्याला लाभले आहेत.
सन 2024-25 साठी रोटरी क्लब चिपळूणचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध प्राध्यापक अविनाश पालशेतकर यांची निवड झाली आहे.
चिटणीस रो. राजेश ओतारी प्रसिद्ध जमीन व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत.
खजिनदार म्हणून रो. स्वप्निल चिले बँकिंग सॉफ्टवेअर तयार करणे आणि सेवा देणे हा त्यांचा व्यवसाय आहे. चिपळूण रोटरी क्लबचे यावर्षी ५० वे वर्ष साजरा करण्यात येणार आहे. या काळात संस्थेने सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रम राबविले. सर्व क्षेत्रात यशस्वी अशी व्यक्तिमत्त्वे निस्वार्थी भावनेने या चळवळीच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम कायम राबवीत असतात.
रो. अशोक नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्या कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा होईल.
रो. अशोक नाईक यांनी कर्नाटक विद्यापीठातून सायन्स मधून पदवीधर शिक्षण प्राप्त केले.
रो. नाईक यांनी 1998 ला रोटरीची सुरुवात केली. गेले 25 वर्ष डिस्ट्रिक्ट साठी विविध पदांवर कार्य केले आहे. 2021-22 रोटरी फाउंडेशनच्या प्रेसिडेंट व मेजर डोनर म्हणून त्यांची ओळख आहे. रो. नाईक यांनी 27 वेळा रक्तदान केले आहे. ह्यूमन राइट्स इंडियन आयकॉन अवॉर्ड भारत सरकारकडून प्रदान करण्यात आले आहे. अतिशय बहुरंगी असे व्यक्तिमत्व चिपळूण रोटरी क्लबच्या पदग्रहण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहे. यंदा असिस्टंट गव्हर्नर रो. वकील शाल्मली अंबुलकर, रत्नागिरी यांची नियुक्ती झाली आहे.










