कोकण रेल्वे मार्गावर मालपे बोगद्यात चिखल व पाणी

कोरेची वाहतूक ठप्प

बांदा : प्रवीण परब

गेले तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंकण रेल्वे मार्गावरील मालपे ( पेडणे-गोवा) बोगद्यात पाणी व चिखल भरल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्यस्थीतीत गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या सिंधुदुर्गमधील काही स्थानकात थांबवून ठेवल्या आहेत. तर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या गोव्यात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे कडून अजूनही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बोगद्यात सध्या रेल्वेचे इंजिनिअर दाखल झाले असून ते पाहणी करून अहवाल देतील. त्यानंतर वाहतूक नियमित सुरू राहील किंवा बंद करण्यात येईल हे ठरविण्यात येणार आहे. तोपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही वर्षांपूर्वी अशीच येथील टनेल मध्ये चिखल व पाणी असल्याने काही दिवस वाहतूक बंद होती. दरम्यान, सिंधुदुर्गातील सर्वच स्थानकावर प्रवाशांची गर्दी झालेली दिसून येत आहे.