देवगड निपाणी मार्गावरील ते धोकादायक झाड सार्वजनिक बांधकामने हटवले

देवगड निपाणी मुख्य मार्गावरील तळेबाजार येथील मार्गानजीक वाळलेल्या स्थितीत एक मोठा वृक्ष होता.धोकादायक स्थितीत असलेला हा वृक्ष कधीही कोसळून देवगड निपाणी मार्ग बंद होण्याच्या स्थितीत होता.

संभाव्य धोका लक्षात घेता देवगड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता बासूदकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बोलावून तात्काळ हा वृक्ष जेसबीच्या साहाय्याने बाजूला करून संभाव्य धोका टाळला , याबद्दल तळेबाजार पंचक्रोशीतील वाहनचालकामधून समाधान होत आहे.