सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव पिंपळवाडी येथील आदर्श व्यक्तिमत्त्व आणि समाजभूषण कै. श्री. गणू यशवंत राऊळ उर्फ नाना मास्तर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाना मास्तर यांच्या परिवाराच्या वतीने आयोजित या सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जपत मोफत नेत्रतपासणी शिबिर आणि भक्तीमय कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे.
*गुरुवार दिनांक ३० रोजी मोफत नेत्रतपासणी शिबिर*
नाना मास्तरांच्या स्मृती प्रित्यर्थ गुरुवारी, ३० एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ‘मोफत नेत्रतपासणी शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. एक सामाजिक उपक्रम म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील सर्व गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*१ मे रोजी भक्तीमय कीर्तन सोहळा*
शुक्रवार, १ मे रोजी नाना मास्तरांचे वर्षश्राद्ध आहे. या निमित्ताने रात्री ७:३० ते ९:३० या वेळेत भक्तीमय कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम द. पोखरकर यांची कीर्तन सेवा यावेळी लाभणार आहे. या सोहळ्याला श्री गजानन (आबा) मेस्त्री (तबला) आणि श्री. धनंजय प्रभु देसाई (हार्मोनियम) हे साथसंगत करणार आहेत.
कै. नाना मास्तरांनी आयुष्यभर जोपासलेली मूल्ये आणि दिलेले संस्कार यांच्या स्मृती जपण्यासाठी ‘नाना मास्तर परिवार’ या सोहळ्याचे नियोजन करत आहे. हे सर्व कार्यक्रम मळगाव पिंपळवाडी येथे पार पडणार असून, सर्व ग्रामस्थांनी आणि हितचिंतकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.











