माजी अध्यक्ष कै श्रीकांत रघुनाथ सांबारी यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजन
आचरा–अर्जुन बापर्डेकर
श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा तर्फे शुक्रवार ८ मे रोजी दुपारी ठीक ३. ३० वाजता *संस्थेचे माजी अध्यक्ष कै. श्रीकांत रघुनाथ सांबारी यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त नमन नटवरा ‘ अर्थात ‘नाट्योत्सव ‘* हा वाचकांच्या आवडत्या नाटकातील कोणत्याही प्रवेशाचे वाचन कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी वेळ तीन ते पाच मिनिटे असून
ज्या नाट्यरसिकांना या वाचनात सहभाग घ्यायचा असेल त्यांनी वाचन मंदिर येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या कामकाजाच्या वेळेत ०२३६५-२४६०१७ या नंबरवर संपर्क साधावा. असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमा दरम्यान कै.श्रीकांत सांबारी यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त राजेश तुकाराम भिरवंडेकर सर( प्राथमिक शिक्षक,शाळा- आचरे गाऊडवाडी) सौ.लक्ष्मी गोविंद राणे (प्राध्यापिका एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज सुकळवाड, ओरोस ), कु.कृतिका शिवराम आयर,(बालवाचक )कु.कावेरी लक्ष्मण परब,(बालवाचक )श्री.मंगेश नागेश परब (वृत्तपत्रे वाचक )या पाच *आदर्श वाचकांचा सत्कारही* संस्था व मंदार सांबारी कुटुंबिय यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. तरी सर्व श्रीकांत सांबारी प्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर , श्रीमती वैशाली सांबारी,मंदार सांबारी यांनी केले आहे.












