
पाण्याचा वेग वाढताच : रुळावर सर्वत्र चिखल
बांदा : प्रवीण परब : कोकण रेल्वे मार्गावर मालपे – पेडणे बोगद्यात पाण्याचा प्रवाह वेग प्रचंड असल्याने चिखल वाढतच आहे. पिशव्या टाकून पाणी एका बाजूने बोगद्यातून बाहेर नेण्याचा कोरे प्रशासनाचा प्रयत्न तकलादू असल्याचे चित्र आहे. मुंबईहून गोव्याकडे येणाऱ्या गाड्या सावंतवाडी पर्यंत सोडण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.
आज सकाळपासून पावसाचा जोर कमी असला तरीही बोगद्यातील पाण्याचा वेग मात्र तसाच आहे. त्यामुळे रुळावर सर्वत्र चिखल साचला आहे. रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून आहेत. पावसाचा जोर कमी राहिल्यास आज संध्याकाळ पर्यंत वाहतूक पूर्ववत होईल, असा अंदाज जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी वर्तविला आहे.












