श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर फोंडाघाट-पावणादेवी येथे सात प्रहरांचा अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) :कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि फोंडाघाट-पावणादेवी येथे सात प्रहरांचा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त निमंत्रित संगीत भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मेजारेश्वर भजन मंडळ, नागवे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धेतील सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे, प्रथम क्रमांक : मेजारेश्वर भजन मंडळ, नागवे बुवा : अमेय आर्डेकर, द्वितीय क्रमांक : नादब्रह्म भजन मंडळ, कसाल बुवा : सुंदर मेस्त्री, तृतिय क्रमांक : सिद्धी विनायक प्रा.भ. मंडळ बुवा : दुर्गेश मिठबावकर, उत्तेजनार्थ क्रमांक दत्त प्रा. भजन मंडळ, बुवा : नरेंद्र मेस्त्री, उत्कृष्ट गायक : गांगेश्वर प्रा.भ.मंडळ बुवा : गिरीष घाडीगावकर, उत्कृष्ट हार्मोनियम दत्त प्रासादिक भजन मंडळ बुवा : नरेंद्र मेस्त्री, उत्कृष्ट पखवाज राधाकृष्ण प्रा.भ. मंडळ पखवाज वादक मिलींद लाड, उत्कृष्ट तबला मेजारेश्वर प्रा.भ. मंडळ तबला वादक पंकज सावंत, उत्कृष्ट गजर : सिद्धीविनायक प्रा.भ.मंडळ बुवा : दुर्गेश मिठबावकर, उत्कृष्ट कोरस मोरेश्वर प्रा.भ. मंडळ बुवा : भार्गव गावडे, उत्कृष्ट झांज : गुरूदास प्रा.भ.मं. झांज वादक : श्री. स्वप्निल घाडगे,यांचा समावेश आहे.परीक्षक म्हणून मारुती मेस्त्री, ज्ञानदेव येंडे तर निवेदक म्हणून राजा सामंत यांनी काम पाहीले.
-नितेश राणे):भजन स्पर्धेचे उद्घाटन करताना आ.नितेश राणे.दत्ता सामंत,सुरेश सामंत,ठाकूर गुरुजी,बाळ महाजन,कौस्तुभ रेडकर,प्रथमेश महाजन ,बबन हळदिवे,मनोज रावराणे,संतोष आग्रे,पंढरी वायंगणकरआदी.