चिपळूण (प्रतिनिधी):- खेड तालुक्यातील साखर बामणवाडी येथील अंजिराबाई विठोबा चव्हाण यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने साखर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. भारतीय सैन्य परंपरा लाभलेल्या घरामधील माऊली होत्या.
श्रीमती अंजिराबाई चव्हाण या गावातील प्रत्येक सामाजिक सांस्कृतिक आधी उपक्रमांमध्ये सहभागी होत असत. तसेच सुखदुःखात देखील त्या नेहमीच अग्रेसर असत. आपलं कुटुंब एकसंघ राहण्याबरोबरच वाडी आणि साखर गावाच्या विकासात भर कसा राहील याबद्दल अंजिराबाई अग्रगण्य होत्या. यामुळे त्या गावात माऊली म्हणून जात होत्या. कृती घडत असताना संस्कार वेचायचे असतात आणि चांगल्या कृतीने घर आणि पर्यायाने समाज कसा चांगल्या रीतीने चालेल हे ध्येय या माऊलीने कायम राखले. यामुळे गावात त्यांना आदराचे स्थान होते.
मात्र, श्रीमती अंजिराबाई चव्हाण यांचे दिनांक ७ जुलै रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात चंद्रकांत, दीपक, राजेंद्र, संदीप असे चार मुलगे तर;विवाहित मुली सौ. पुष्पा उतेकर, सौ. नम्रता म्हापदी, सौ. सुरेखा उतेकर याचबरोबर सुना, नातु आणि पणतू असा मोठा परिवार आहे.
स्वर्गीय अंजिराबाई चव्हाण यांचे दशक्रिया विधी १६ जुलै रोजी तर उत्तर कार्य १८ जुलै रोजी साखर बामणवाडी होणार आहे. होणार आहे.











