पाचेरी सडा येथे डोंगर खचला

 

प्रशासनाकडून 11 घरांना स्थलांतरणाच्या नोटीस

गुहागर l प्रतिनिधी :गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा बौद्ध वाडी येते डोंगर खचल्याची घटना घडली आहे. दरड रस्त्यावरती आली रस्त्याच्या खालच्या साईटला 42 कुटुंबिये आहेत.. लोक वस्ती मोठ्या प्रमाणात आहे रोड लगत असणाऱ्या 11 घरांना प्रशासनाकडून स्थलांतरीच्या नोटीसा देण्यात आले आहेत. 11 कुटुंब पैकी नऊ कुटुंब ही मुंबईला असतात तर उर्वरित तीन कुटुंबांना येथीलच विहारा मधे स्थलांतरित करण्यात आले आहे घटनास्थळी गुहागरचे तहसीलदार परीक्षेत पाटील, बांधकाम विभागाचे अधिकारी, तसेच पाणी विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्यावरती आलेली माती जेसीबीच्या साह्याने बाजूला करून रस्ता मोकळा करण्याच्या सूचना दिल्या.

 

 

गुहागर चे तहसीलदार पाटील यांनी भुगर्भ तज्ञ यांना येऊन या घटनेची पाहणी करण्याचे पत्र दिले होते. येथील ग्रामस्थांना जी पिण्याची पाण्याची सोय नव्हती त्यासाठी गुहागर प स कडून त्यांना एक पाण्याची टाकी तात्काळ उपलब्ध करून देऊन देण्यात आली.