वाडी खुर्द गावातील जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचित होण्यापुर्वीच या भागात झाले जमिन खरेदी विक्रीचे व्यवहार

 

भाजपा सोशल मिडिया सदस्य सुरज पेडणेकर यांची चौकशीची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांकडे केली लेखी तक्रार

राजापूर (प्रतिनिधी): सरकारने राजापूर तालुक्यातील वाडी खुर्द गावातील औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचित केलेल्या सुमारे १२५ हेक्टर (३०८ एकर) जमीनीपैकी अनेक जमिनीचे काही परप्रांतीयानी सुमारे सहा महिने ते वर्षभरापुर्वी खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. अशा प्रकारे शासनाकडून संपादिन केल्या जाणाऱ्या जमिनीबाबत या खरेदीदारांना अगादेरच माहिती कशी काय मिळते व त्यानंतर हे क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून् कसे काय जाहिर केले जाते असा सवाल भाजपा सोशय मिडिया राजापूरचे सदस्य व युवा मोर्चाचे माजी पदाधिकारी सुरज गुरव यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी सखोर चौकशीची मागणी करत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. तशी माहिती पेडणेकर यांनी दिली आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, वाडी खुर्द गावातील विशिष्ट क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ अंतर्गत औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे.

नवीन औद्योगिक क्षेत्रापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर बारसू गाव आहे, सन २०१९ मध्ये, MIDC ने बारसू, सोलगाव आणि इतर गावांचा काही भाग औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केला होता. त्यानंतर आता पुन्हा राजापूर तालुक्यातील वाडीखुर्द गावातील ३०० एकर जमिन औद्योगिक क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आली आहे. आता याच परिसरात शासनाने वाडी खुर्द गावातील सुमारे १२५ हेक्टर (३०८ एकर) जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचित केली आहे.

मात्र या परिसरातील काही जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार हे सहा महिने ते वर्षभराच्या कालावधीत झाले आहेत. काही परप्रांतीयांनी या जागा खरेदी केल्याचा दावा पेडणेकर यांनी केला आहे. अशा प्रकारे एखाद्या भागात मोठया प्रमाणावर जमिन खरेदी विक्रीचे व्यवहार होतात आणि मग शासन ती जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहिर करते यात नेमके गौंडबाल काय असा सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी पेडणेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तशी माहिती पेडणेकर यांनी पत्रकारांना दिली आहे