दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मतदारसंघात १८ कोटी ९८ लाखाची कामे मंजूर

सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्य शासनाच्या जुलै २०२४ च्या अर्थसंकल्पीय बजेट म्हणून महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी मतदारसंघातील कामांना १८ कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर झालेला आहे.
या अंतर्गत मंजूर कामे – सावंतवाडी तालुक्यातील कनेडी कुपवडे कडावल नारूर वाडोस शिवापुर शिरशिंगे रस्ता रा मा १९० वर ८८ / ०० ते ९०/०० मध्ये रुंदीकरण व सुधारणा करणे – २ कोटी ७० लक्ष, सावंतवाडी तालुक्यातील वेंगुर्ला आकेरी आंबोली बेळगाव रस्ता रा मा १८० किमी १८/०० ते २१/२००

 

मध्ये अपघात प्रवण क्षेत्राची सुधारणा करणे-२ कोटी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील बांदा दोडामार्ग आयी रस्ता रा मा १८६ किमी४२/७०० ते ५९ / २१५ मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे – ४ कोटी, दोडामार्ग तालुक्यातील तिलारी घोडगेवाडी पारगड रस्ता रा मा १८७ किमी ०/०० ते ६/४०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे- ४.
तसेच वेंगुर्ला तालुक्यातील बोर्डी ठाणे न्हावाशेवा रेवस विजयदुर्ग मालवण वेंगुर्ला शिरोडा सातारडा प्रमुख राज्यमार्ग क्रमांक ४ किमी ७४२/०० ते ७५०/०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे २ कोटी २५ लक्ष ही कामे मंजूर करण्यात आली आहेत.
या कामामुळे मतदार संघातील खेड्यापाड्यातील लोकांच्या वाहतूक व्यवस्थेची चांगल्या प्रकारे सोय होणार आहे. अनेकगावे, अनेक वाड्या मार्गाला जोडल्या जाणार आहेत.
ही कामे मंजूर झाल्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,महिला आघाडी जिल्हाप्रमुख ॲड सौ. निता सावंत – कविटकर, सावंतवाडी तालुकाप्रमुख बबन राणे, वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी मंत्री दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.