विलवडे येथे चारचाकी कलंडली.

ओटवणे (प्रतिनिधी ) बांदा दाणोली मार्गांवर बोलोरो पिकअप MH 12 YB 2234 या गाडीचा अपघात झाला असून समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने हूल दिल्याने रस्त्याच्या बाजूला घेण्याच्या नादात गाडी रस्त्याच्या बाजूला कलंडली आणि चिखलात रुतून अपघातग्रस्त झाली. गाडीचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने यात चालकाला मात्र कोणतीही दुखापत झाली नाही. ही गाडी पुणे येथून बांदा दाणोली मार्गांवरून गोवा येथे जात होती.या मार्गात अपघात हे नित्याचेच. लहान मोठे अपघात या मार्गांवरील याच परिसरात होतात.मार्गाची झालेली अवस्था आणी रस्त्यावर साचलेलं पाणी याचा अंदाज न आल्याने तसेच सध्या सुरु असणाऱ्या रस्त्याच्या कामामुळे अपघाताची मालिका सूरूच आहे. विलवडे परिसरात तर सातत्याने हे अपघात होत आहेत सर्वजनिक बांधकाम खात्याचे डोळे कधिही उघडोत वाहन चालकांनी स्वतः ची काळजी घेत वाहन हाकावीत. जर सार्वजनिक बांधकाम खात्याला वेळ मिळालाच तर या रस्त्याची परिस्थिती सुधरवावी अशी संतप्त प्रतिक्रिया वाहन चालक या भागातील ग्रामस्थ यांच्याकडून येत आहे.