जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत डी.जे .सामंत इंग्लिश मीडियम स्कूल लांजाचे सुयश 

 

 

 

लांजा (प्रतिनिधी) राजापूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्युरोगी व फुमसे तायक्वांदो स्पर्धेत डी.जे.सामंत इंग्लिश मीडियम स्कूल लांजाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

त्यामध्ये दहावीतील अनुज बाळासो वाडते याने सुवर्णपदक पटकावले .सुजल गौतम कांबळे याने रजतपदक पटकावले. इयत्ता सहावीतील त्रिशा महेश नारकर हिने कांस्यपदक अशी पदके पटकावली. या विद्यार्थ्यांना डी.जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या तायक्वांदो प्रशिक्षिका शितल आचरेकर यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. तसेच या विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक वृंद ,मुख्याध्यापक ,पालक आणि संस्थाचालक यांचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे