रविराज चिपकर यांनी सोन्सुरे येथे साकारले श्री. विठ्ठलाचे १६ इंच उंचीचे वाळू शिल्प 

 

 

वेंगुर्ले l दाजी नाईक :आषाढी एकादशीच्या निमित्ताने वेंगुर्ले आरवली सोन्सुरे येथील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी विठ्ठलाचे वाळू शिल्प साकारले आहे. अवघ्या एक तासात १६ इंच उंचीचे वाळू शिल्प रविराज चिपकर यांनी साकारले आहे सदर वाळू शिल्प त्यांनी सोनसुरे येथे साकारले आहे.

त्यांनी महाराष्ट्रात सर्वात कमी उंचीच वाळू शिल्प साकारल्याचा दावा केला आहे. हे वाळू शिल्प पाहण्यासाठी आता नागरिक आणि भाविक यांची सोन्सुरे येथे गर्दी होत आहे.