वेंगुर्ला – वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील श्री देव जैतीर उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असून आज या ठिकाणी जाऊन महाराष्ट्र प्रदेशचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी दर्शन घेतले. यावेळी उपस्थित भक्तगणांची भेट घेऊन संवाद साधला आणि उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी नारायण कुंभार, विजय रेडकर, प्रणव वायगणकर, सचिन नाईक, जयवंत तुळसकर, सुजाता पडवळ, चंद्रे परब, साई परब, यशवंत (बाळू )परब, अतुल तुळसकर, ऍड. अनिल निरवडेकर, ऍड. रामनाथ बावकर आदी उपस्थित होते.












