सार्व. बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधेसाठी १६ कोटी ८६ लाख निधी मंजूर

भाजपा सरचिटणीस रविंद्र नागरेकर यांची माहिती

राजापूर (वार्ताहर): राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून राज्याच्या अर्थसंकल्पातून राजापूर तालुक्याला भरघोस निधी प्राप्त झाला असून मागील अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेली व जनतेची मागणी असलेली रस्ते पुलांची कामे मार्गी लागणार असून तालुक्यात दळणवळणाला चालना मिळणार आहे. राजापूर तालुक्याला नाम. रविन्द्र चव्हाण यांच्या माध्यमातून एकुण १६ कोटी ८६ लाख रूपयांचा निधी रस्ते आणि पुलांसाठी मंजूर झाल्याची माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर यांनी दिली आहे.

 

राजापूर तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधेसाठी निधी मिळावा म्हणून पालकमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे यांनी शिफारस केली होती. तर महायुती शासनाच्या माध्यमातून तालुक्याला निधी उपलब्ध होण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला प्रदेश सरचिटणीस सौ. शिल्पा मराठे, जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, भास्कर सुतार, महिला तालुकाध्यक्षा सौ. सुयोगा जठार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तर या निधीतून मोठया प्रमाणावर तालुक्यातील विकास कामांना चालना मिळणार असल्याने सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांना धन्यवाद दिले आहेत.

 

यामध्ये प्रामुख्याने खरचते कळसवली रस्ता कि.मी. ३/४०० ते ४/००० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. रू.८.०० लाख.

रायपाटण गांगणवाडी ते कदमवाडी र्याध्दवाडी खाडेवाडी रस्ता कि. मी. ३/००० ते ४/५०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. रू.१५.०० लाख.

फुफेरे लिगमवाडी रस्ता कि.मी. ०/००० ते १/००० मध्ये मजवुतीकरण व डांबरीकरण करणे. रू. २०.०० लाख.

गोठणे मराठवाडी राववाडी मठवाडी तिसेवाडी रस्ता कि.मी. ०/७०० ते २/००० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. रू.१८.०० लाख.

पडवे तांबे पाखाडी जोशीवाडी बौध्दवाडी गावपडवे वालमवठार ते प्रजिमा क्र.७२ रस्ता कि.मी. ०/००० ते ५/५०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. रू.५०.०० लाख.

मौजे ओणी मोडकवाडी ग्रामा ४१७ किमी ०/६०० मध्ये लहान लहानपूलाचे बांधकाम करणे रू.१ कोटी ५० लाख.

मौजे ओणी मोडकवाडी ग्रामा ४१७ किमी ०/९५० मध्ये लहान लहान पूलाचे बांधकाम करणे ता. राजापूर, ज़ि. रत्नागिरी १ कोटी ५० लाख.

मोजे मोसम धुरीवाडी ग्रामा ३४५ येथे किमी ०/७५० मध्ये लहान पुलाचे बांधकाम व जोडरस्ता तयार करणे, रू. १ कोटी ५० लाख.

आंगले सरवणकरवाडी राऊतवाडी भुवडवाडी ते फुफेरे हेल्थ सेंटर रस्ता कि. मा. ०/००० ते ३/५०० मध्ये डांबरीकरण करणे. रू. ३५.०० लाख.

गोठणे मराठवाडी राववाडी मठवाडी तिसेवाड़ी रस्ता कि.मी. ४/००० ते ५/१०० डांबरीकरण करणे. रू.१०.०० लाख.

तिवंदामाळ मंदरुळ चुनाकोळवण रस्ता कि.मी. ०/००० ते १/००० मध्ये डांबरीकरण करणे रू.१०.०० लाख.

परटवली बौध्दवाडी कुंभारवाडी रस्ता किमी १/००० ते १/५०० मध्ये मजवुतीकरण व डांबरीकरण करणे. रू.१५.०० लाख.

धारतळे मोगरे राजवाडी रस्ता कि.मी. १/५०० ते २/५०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. रू.१०.०० लाख.

गोठणे चिखलगाव ओणी दैतवाडी रस्ता कि.मी. ०/००० ते २/००० मध्ये डांबरीकरण करणे. रू.२०.०० लाख.

रानतळे ते धोपेश्वर गुरववाडी रस्ता कि. मी. ०/०० ते २/८०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे ग्रा. मा. १३६. रू. २०.०० लाख.

हातदे आजिवली रस्ता कि.मी. ०/०० ते ४/०० मध्ये डांबरीकरण करणे. रू. ४०.०० लाख.

वाडातिवरे भराडीनवाडी कर्णरकरवाडी लिंगायतवाडी पडवणे रस्ता कि.मी. ०/००० ते ५/००० मध्ये डांबरीकरण करणे. रू. ५०.०० लाख.

कोतापूर मोंडेवाडी पिशदेवाडी भालावली रस्ता. रू. २५.०० लाख.

मिठगवाणे कांचनवाडी सुवर्णवाडी प्र. रा. ४ ला मा. ४ ला जोडणारा रस्ता कि. मी. ०/००० ते १/५०० मध्ये डांबरीकरण करणे. रू.१५,०० लाख.

शिवणे बु. गुरववाडी रस्ता. रू. २०.०० लाख.

पेन्डखळे निनावेवाडी वरचीवाडी वैतागवाडी ते संकेश्वर मंदिर रस्ता ०/०० ते ३/००. रू. २५.०० लाख.

कणेरी मुख्य रस्ता ते ब्राम्हणवाडी बौध्दवाडीकडे जाणारा रस्ता ग्रामा-१७९ किमी. ०/०० ते २/००ता. रू. ३०.०० लाख.

गोठणे नाचणेकरवाड़ी नं.१, नं.२, नं.३ प्रजिमा-६८ ला मिळणारा रस्ता किमी ०/०० ते २/२०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे. ग्रामा-८५. रू.२०.०० लाख.

प्ररामा-४ ते सागवे वरचे बुरंबेवाडा रस्ता किमी ०/०० ते १/०० मध्ये सुधारणा करणे व डांवरीकरण करणे. ग्रामा-१७७.रू.२०.०० लाख.

रा.म.मा क्र.६६ ते नेरवाड़ी तिसेवाडा तरळवाडी रस्ता किमा ०/०० ते ३/२०० मध्ये सुधारणा करणे. रू. २५ लाख.

पन्हाळे तर्फ राजापूर भंडारवाडी कपलवाडी किमा ०/०० ते ०/५०० मध्ये सुधारणा करणे व । डांबरीकरण करणे. ग्रामा-१७७. रू. २०.०० लाख.

चिखले चिराटवाडी रस्ता किमी ०/०० ते १/०५० मध्ये सुधारणा करणे व डांबरीकरण करणे. ग्रामा-८६. रू. २५.०० लाख.

भालावली बौध्दवाडी रस्ता किमी ०/०० ते ०/७०० मध्ये सुधारणा करणे व डांबरीकरण करणे. ग्रामा-२१९. रू.२०.००

मुन्सिपल हद्द ते कोदवली राववाडी अध्यापक विद्यालय मांडवकरवाडी रस्ता किमी ०/०० ते ५/०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे. ग्रामा-१२०. रू.२५.०० लाख.

प्ररामा-४ ते कारिवणी चांदवण रस्ता किमा ०/०० ते ०/८०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे ग्रा.मा.१७३ रू. १५.००लाख.

धारतळे भालावली चव्हाटा रस्ता किमी ०/००ते ३/४०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे. ग्रामा-२१८. रू. २०.०० लाख.

पडवे नवलादेवी मंदिर ते आंबेरकोणी जितणेश्वर मंदिर रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे, ग्रामा-१७६. रू. १५.०० लाख.

पेन्डखळे चिपटेवाडी किनरेवाडी रस्ता किमी ०/०० ते १४५०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे. रू. २५.०० लाख.

कशेळी बांध ते आगवेकरवाडी रस्ता किमी ००० ते ११४०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे. ग्रामा-४९. रू. ५०.०० लाख.

परुळे गुरववाडी पाटीलवाडी ते धरण रस्ता ग्रा. मा. 202 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे. रू. १ कोटी ४०.०० लाख.

ओशीवळे मुस्लिमवाडी तं बागवेवाडी रस्ता. रू. १ कोटी८०,०० लाख.

गोवळ गुरववाडी रस्ता किमी ०/०० ते १४३०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे. ग्रामा-१३५. रू. २ कोटी. असे एकुण १६ कोटी ८६ लाख रूपयांचा निधी राजापूर तालुक्यातील रस्ते आणि पुलांच्या उभारणीसाठी उपलब्ध झाला आहे.