रत्नागिरी : पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी द्वारा 7ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांच्या कार्यालयात टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शन अदालत आयोजित केली आहे.
निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तीवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारी ज्यांचे 3 महिन्यांच्या आत निपटान झालेले नाही अशा प्रकारणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये कायदेशीर प्रकारणे (CAT/Court Cases), नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार इ. आणि नीती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. आपले अर्ज श्री महेश एन, लेखा अधिकारी / सचिव, पेन्शन अदालत, पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांचे कार्यालय, पणजी यांचे नावे 26 जुलै रोजी रोजी किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात. ई मेल accts.goa@indiapost.gov.in. अर्ज सादर करु शकत. 26 जुलै 2024 च्या नंतर मिळालेल्या अर्जांवर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.










