लांजा (प्रतिनिधी) घरची परिस्थिती बेताची असतानाही दहावी मध्ये ९३.६०% गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या तालुक्यातील खावडी येथील विराज राजाराम कोतवडेकर याला लांजा भाजपाच्या वतीने आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.
खावडी गावातील कु. विराज राजाराम कोतवडेकर हा यावर्षी खावडी हायस्कूल मध्ये इयत्ता १० वी मध्ये शिकत होता. घरची परिस्थिती बेताची असतानाही या विराजने दहावी मध्ये ९३.६०% गुण मिळवून उत्तीर्ण झाला.
त्याचे वडील राजाराम कोतवडेकर व आई सौ. राजेश्री कोतवडेकर शेतकरी आहेत. विराज याच्या
पुढील शिक्षणासाठी भारतीय जनता पार्टी लांजा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांनी आर्थिक मदत दिली.व त्याच्या यशाचे कौतुक केले.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष
महेश (मुन्ना) खामकर, अनिल पन्हळेकर जिल्हा कमिटी सदस्य, तालुका सरचिटणीस शैलेश खामकर विराज हरमले , राकेश मांडवकर ग्रामपंचायत सदस्य पालू हे पदाधिकारी उपस्थित होते.












