गावठी गटातून शिरवली येथील भैरी चंडिका विजेता तर मालघरमधील प्रकाश किळजे यांची बैलजोडी उपविजेता
मनसे शेतकरी सेना आयोजित जिल्हास्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा
चिपळूण (प्रतिनिधी) : मनसे शेतकरी सेना आयोजित जिल्हास्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेत घाटी गटातून रत्नागिरी पाली येथील संजय वामन सावंत यांच्या दोन्ही बैलजोडीने प्रथम आणि द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक स्वराज्य स्वप्नील गुरव यांच्या बैलजोडीने पटकावा. तसेच गावठी बैलजोडी मधून शिरवली भैरी चंडिका विजेते, मालघरमधील प्रकाश किळजे उपविजेते तर तृतीय क्रमांक वाडावे सराडे मधील सुरेश पर्शुराम सोलकर यांच्या बैलजोडीने पटकावला.
या सर्व विजेत्यांना मनसे नेते अविनाश जाधव व प्रदेश सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह मनसे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा नारदखेरकी येथे रंगतदार झाली. ही स्पर्धा पाहण्यासाठी रसिकांनी तोबा गर्दी केली होती.
या स्पर्धेचे आयोजन मनसे शेतकरी सेनेतर्फे करण्यात आले होते. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील ७४ बैल जोड्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्यांना १ लाख ७ हजार रुपयांचे रोख बक्षीस व आकर्षक मानाचे चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेतील घाटी गटातून चतुर्थ क्रमांक संगमेश्वर – तूरळ मधील अर्णव सचिन हरेकर, पाचवा क्रमांक शिंदे आंबेरे येथील संतोष सीताराम आलीम, सहावा क्रमांक चिपळूण शिरवली येथील भैरी चंडिका, सातवा क्रमांक आरवली येथील स्वराज्य स्वप्नील गुरव या सर्व बैलजोडीच्या मालकांना रोख रक्कम आणि चषक तर गावठी गटातून चतुर्थ क्रमांक मालघर मधील गंगाराम महाडिक, पाचवा क्रमांक संगमेश्वर- तूरळ येथील विग्नेश दिनेश हरेकर, सहावा क्रमांक शिंदे आंबेरे येथील कृष्णा काशीराम शिंदे, सातवा क्रमांक शिरवली भैरी चंडिका राजू लाड या सर्व बैलजोडीच्या मालकांना रोख बक्षीस व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या सर्व बैलजोडीवर गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव, राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, गुहागर विधानसभा संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवलकर, जिल्हा सचिव संतोष नलावडे, शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष उमेश लटके, गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, चिपळूणचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ डोळस, दापोली मधील तालुका अध्यक्ष केदार साठे, नारदखेरकी सरपंच राघो आंबवकर, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खेतले, मनसे चिपळूण तालुका सचिव संदेश साळवी, शेतकरी सेनेचे चिपळूण तालुकाध्यक्ष सुरेश घाग, खेडचे तालुकाध्यक्ष मंगेश चाळके, गुहागर शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रसाद कुष्टे, खेडचे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, दापोली शहराध्यक्ष साई पुसाळकर, गुहागर शराध्यक्ष नवनाथ साखरकर, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे, विनोद भोबस्कर आदी उपस्थित होते.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मनसे शेतकरी सेना रत्नागिरी जिल्हाध्यक्ष उमेश लटके, चिपळूण तालुकाध्यक्ष सुरेश घाग, कळंबट गट उपाध्यक्ष संतोष हातीसकर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मेहनत घेतली.












