*माखजन |वार्ताहर* नुकतीच पुणे येथे झालेल्या नटसम्राट बालगंधर्व नाट्यसंगीत स्पर्धा २०२४ मध्ये ५ ते १५ वर्षे वयोगटातून रत्नागिरीच्या सार्था नरेंद्र गवाणकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
पुणे भारत गायन समाजाचे माजी अध्यक्ष कै.श्री सुधाकर जोशी आणि कै.शरयू जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुणे भारत गायन समाज यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आली होती.यामध्ये पहिल्या गटात राज्यभरातून १८ स्पर्धक निवडण्यात आले होते.यामध्ये सार्थाचा समावेश होता.पुण्यात झालेल्या अंतिम स्पर्धेत सार्थाने द्वितीय क्रमांक पटकावला.तिला ख्यातनाम गायक आनंद भाटे यांच्या हस्ते रोख ५ हजार व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण शास्त्रीय गायक मुकुंद मराठे,व कविता मेहंदळे यांनी केले.सार्था ही रत्नागिरी च्या पटवर्धन हायस्कूल ची विद्यार्थिनी आहे.तर रत्नागिरीतील ख्यातकीर्त गायिका मुग्धा भट सामंत यांची शिष्या आहे.
सार्था च्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.












