*माखजन l वार्ताहर* संगमेश्वर तालुक्यातील आरवली कुंभारखाणी हा मुख्य रस्ता प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे.या रस्त्याला नव्याने बांधण्यात आलेल्या मोरीचे काम अर्धवट झाले आहे. तसेच मोरीच्या व रस्त्याच्या बाजूचा मातीचा भरावा निघून गेल्या मुळे हा मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे. बाजूला गडनदीचे पात्र आहे.त्यामुळे या ठिकाणी संरक्षण भिंतीची गरज आहे.या मार्गावरून ग्रामस्थ खाजगी वाहने व शालेय विद्यार्थी बस ने प्रवास करत असतात.सद्या रस्त्याच्या कडेला तात्पुरते बॅरेल लावले असून .या मुळे धोका टळणार नसल्याचे वाहन धारका मधून सांगण्यात येत आहे.सततचा पडणारा पाऊस जमिनीची होणारी धूप यामुळे रस्ता अधिकच धोकादायक बनून अपघाताचे निमंत्रण मिळू शकते.बांधकाम विभागाने तात्काळ या कडे लक्ष देऊन या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी सर्वच स्थरातून होत आहे












