चिंचवली येथे वृद्ध चा पाण्यात बुडून मृत्यू

 

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील चिंचवली गावातील ब्राम्हणवाडी येथील राहणारे ६२ वर्षीय रामचंद्र सखाराम पवार यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २० जुलै रोजी घडली

प्रातः विधीसाठी जातो असे सांगून घराबाहेर पडले. ते रात्री उशिरापर्यंत शोध घेता त्यांचा मृतदेह विठ्ठल रखुमाई मंदिराच्या उत्तरेकडील बाजुला झुडपात अडकलेला आढळून आला. याप्रकरणी येथील पोलिसात आकस्मिक मृत्यू नोंद करून घेऊन अधिक तपास पोलीस करीत आहेत.