आजचा दिवस कसा जाईल? 24 जुलै 2024 – बुधवार

आजचा दिवस कसा जाईल?
24 जुलै 2024 – बुधवार

मेष रास
आज तुम्हाला न्याय मिळेल. कामात यश मिळेल. जे योग्य आहे आणि ज्याची गरज आहे तेच करा. पार्टनरशिप मध्ये लाभ होईल. लग्नाचे प्रपोजल देण्या घेण्याचा विचार करू शकता.

वृषभ रास
आज स्वतः सोबत इतरांची देखील काळजी घ्या. नातेसंबंधांमध्ये वेगळेपणा जाणवेल. स्वतःवर विश्वास ठेवा. सतत मूड्स बदलत राहतील. जमेल तितकेच काम आणि जबाबदारी घ्या.

मिथुन रास
आज तुम्हाला दैवी मदत मिळेल. प्रत्येक कामात यश मिळेल. काही आशादायक घटना घडतील. शक्य तिथे मदत घेतल्यास अडचणीतून मार्ग मिळेल.

कर्क रास
आज तुम्हाला आवडत्या आणि सारखी मानसिकता असणाऱ्या व्यक्तींसोबत राहण्याचा प्रयत्न करा. त्या त्या क्षेत्रातल्या अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यामुळे मदत होईल. लग्नाचे प्रपोजल मिळू शकते. सामाजिक कार्यातून लाभ होईल.

सिंह रास
आज तुम्हाला वाटते त्याप्रमाणे घटना घडणार नाही. एखाद्या घटनेमागे असणाऱ्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे, उद्देशांकडे तुम्ही पाहू शकणार नाही. कशाचे तरी सतत दुःख, निराशा जाणवत राहील.

कन्या रास
आज एका वेळी खूप काही करावे लागेल. एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागेल. ज्यात अडचणी येऊ शकतील. न कंटाळता कसा दिवस घालवता येईल त्याकडे लक्ष द्यावे लागेल. पैशासंबंधी तसेच लोन संबंधित कामे होतील.

तुळ रास
आज कामात यश मिळेल. विशेष घटना घडतील. कौतुक होईल. शिस्तबद्ध राहून काम पूर्ण करा. लग्नासाठी प्रपोजल येऊ शकते. प्रवासाला जाण्यापूर्वी सर्व व्यवस्थित आहे ना याची खात्री करून घ्या.

वृश्चिक रास
आज एखाद्या गोष्टीचे दान करा. गरजू व्यक्तींना मदत करा. इतरांशी थोडेसे प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न केल्यास दिवस आनंदात जाईल. एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडून विशेष सल्ला दिला जाऊ शकतो. ज्यामुळे त्या व्यक्तीचे काम होईल आणि तुम्हाला आशीर्वाद मिळतील.

धनु रास
आज भरपूर काम होईल. नवीन काहीतरी शिकायला मिळेल. अभ्यासात प्रगती होईल. पैशाची कामे होतील. नवीन ऑर्डर्स मिळतील. नवीन प्रोजेक्ट्स मिळतील. दिवस कामामध्ये जाईल आणि त्यामुळे आनंदात देखील जाईल.

मकर रास
आज मनाप्रमाणे काम करा. थांबू नका. तुमच्यामध्ये जी ऊर्जा आणि काम करण्यातला नवीन पण आहे तो जगाला दिसेल. स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा वापर करायला तुम्ही मागे पुढे पाहणार नाही. स्वतःचेच म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करू शकता.

कुंभ रास
आज एखादा छोटा समारंभ, पार्टी होऊ शकते. एखादी गोष्ट मिळण्याच्या आनंदात हे सेलिब्रेशन असू शकते. दिवस आनंदात, मौज मजेत जाईल. चांगल्या प्रतीचे खाणे पिणे आणि भेटीगाठी यामुळे वेळ चांगला जाईल.

मीन रास
आज तुम्ही नियमांचे पालन करा. अधिकारात वाढ होईल. तुमच्यातील लीडरशिप सगळ्यांसमोर येईल. नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. तसेच चालू कामात यश आणि मानसन्मान मिळेल.
@Ritikaslifetherapies
रितिका –
ज्योतिष सल्लागार, अध्यात्मिक मार्गदर्शक
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353