राज ठाकरेंच्या सभेसाठी अखेर कै. प्रमोद महाजन क्रीडांगण झाले फायनल

raj thakare
रत्नागिरीत प्रथमच मनसे प्रमुखांची तोफ धडाडणार 

रत्नागिरी | प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची प्रथमच रत्नागिरी शहरात सभा होत आहे. ही सभा नेमकी कोणत्या मैदानावर होणार याबाबत काहीकाळ संभ्रम निर्माण झाला होता. मात्र अखेरीस मनसेच्या प्रमुख पदाधिकार्यांनी ही सभा आठवडा बाजार येथे घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ६ मे रोजी शहरातील कै. [प्रमोद महाजन क्रीडांगणावर राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दि. ६ मे रोजी रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरे यांनी अनेकदा कोकण आणि रत्नागिरी दौरा केला असला तरीही मनसे प्रमुख म्हणून त्यांची रत्नागिरीत प्रथमच सभा होणार आहे. रत्नागिरी शहराची भौगोलिक रचना बघता ही सभा नेमकी कुठे होणार याबाबत पक्षाचे पदाधिकारी पडताळणी करत होते. त्यातच ही सभा शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर होणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र अनेक वर्षांपासून महाविद्यालयाने अन्य कार्यक्रमासाठी मैदान देणे बंद केले आहे. त्यामुळे मनसे समोर शहराशेजारचे चंपक मैदान आणि कै. प्रमोद महाजन क्रीडांगण हे दोनच पर्याय होते.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत शुक्रवारी दाखल झालेले मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुलाची पाहणी करून हे ठिकाणी सभेसाठी निश्चित केले आहे. मनसेच्या पदाधिकार्यांनी सभेसाठी आठवडा बाजार येथील कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुलाची जागा निश्चित केली आहे. या जागेची नितीन सरदेसाई  आणि पदाधिकार्यांनी पाहणीही केली. त्यामुUे राज ठाकरे यांची रत्नागिरीत दि. ६ मे रोजी होणारी सभा कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात होणार असल्याचे निश्चित झाले आहे.