प्रख्यात मोतिबिंदू सूक्ष्म शस्त्रक्रिया विशेषज्ञ डॉ. वरुण गुप्ता शनिवारी रत्नागिरीत

रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पीटलमध्ये येत्या शनिवारी दि. २७ जुलै रोजी कॉर्निया, मोतीबिंदू तज्ज्ञ डॉ. वरुण गुप्ता रुग्णांची तपासणी करणार आहेत. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला जाड भिंगाचा चष्मा अथवा मोतीबिंदू पिकलेला अथवा सुरवात झाली आहे, अशा रुग्णांची तपासणी ते करणार असून पुढील महिन्यात आधुनिक सूक्ष्म पद्धतीने शस्त्रक्रिया करणार आहेत. याकरिता शनिवारी अशा रुग्णांनी आवर्जून तपासणी करावी, असे आवाहन इन्फिगो आय केअरने केले आहे.

चित्रकूट येथील राष्ट्रीय नेत्र विज्ञान संस्थेतून प्रशिक्षित असलेले डॉ. गुप्ता हे कॉर्निया व मोतिबिंदू स्पेशालिस्ट आहेत. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीचा चष्म्याचा नंबर वजा 3 च्या पुढे असल्यास म्हणजे जाड भिंगाचा, सोडा वॉटरच्या काचांप्रमाणे ज्यांचा चष्मा आहे अशा रुग्णांची विशेष तपासणी डॉ. गुप्ता शनिवारी करणार आहेत. याकरिता अशा रुग्णांनी आवर्जून साळवी स्टॉप येथील इन्फिगो आय केअर हॉस्पीटलमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत तपासणीकरिता यावे.

कॉर्नियाशी निगडीत आजार व ज्यांचे मोतिबिंदू पिकले आहेत किंवा सुरवात झाली आहे, अशा रुग्णांची 3 मिलिमीटर इतक्या कमी छेदातून आधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात डॉ. गुप्ता हे माहिर आहेत. या शनिवारी ते अशा रुग्णांची तपासणी करणार असून पुढील महिन्यात शस्त्रक्रिया करण्यासाठी ते स्वतः येणार आहेत. डोळ्यात फुल पडणे, डोळ्याला मार बसलेला असणे अशा गोष्टींमुळे ज्या रुग्णांची दृष्टी अधू झाली आहे, ज्यांना मोतीबिंदू नाही परंतु चष्मा आहे व तो काढून टाकायचा आहे अशा शस्त्रक्रिया डॉ. गुप्ता
सूक्ष्म पद्धतीने करतात. या रुग्णांनीही तपासणीकरिता यावे, असे आवाहन इन्फिगो आय केअर हॉस्पीटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.