जास्त नंबरचा चष्मा असणाऱ्यांचा नंबर जाऊ शकतो?

इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये डॉ. कामत करणार तपासणी

रत्नागिरी : समाजात अनेक जणांना जाड भिंगाचा, वजा 3 ते पुढे वाढीव नंबरचा चष्मा असतो. यामुळे अशा व्यक्ती, मुले यांना अनेक संधी गमवाव्या लागतात. या व्यक्तींची रेटिना तपासणी करून योग्य उपचाराद्वारे त्यांच्या चष्म्याचा नंबर घालवता येऊ शकतो किंवा कमी करता येऊ शकतो. याकरिता इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये रेटिना तज्ञ डॉ प्रसाद कामत विशेष शिबीर घेणार आहेत.

रत्नागिरी येथील इन्फिगो आय केअरमध्ये दि. 28, 29 आणि 31जुलै रोजी डॉ. कामत तपासणी व उपचार करणार आहेत. तसेच डॉ. कामत दि 30 रोजी लांजा येथे रुग्णालयात तपासणी करणार आहेत.

मधुमेह असणाऱ्या रुग्णांना सुद्धा रेटिनाची समस्या जाणवते. अशा रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय या शिबिरात वजा 3, ते वजा 15 म्हणजे जाड भिंगाचा चष्मा असणाऱ्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या रुग्णांची विशेष तपासणी केली जाणार आहे. शंकर नेत्रालय, चेन्नई येथून प्रशिक्षित डॉ. प्रसाद कामत हे इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे रेटिना तज्ञ आहेत.

कोणत्याही वयोगटातील वजा 3 च्या पुढे चष्मा असणाऱ्या व्यक्तींनी या विशेष तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच
येथे निदान झाल्यावर चष्मा काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ही शस्त्रक्रिया पुढील महिन्यात डॉ. कामत करणार आहेत. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.